लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यात गत चार दिवसांपासून पडत असलेल्या धुक्यामुळे गहू, हरभºयासह भाजीपाला पिक धोकयात आले आहे. धुक्यामुळे पिकांवर रोगराई निर्माण होण्याची शकयता असल्याने शेतकºयांकडून विविध प्रकारची फवारणी करुन पीक वाचविण्याची धडपड दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे शेतकºयांचे नुकसान होण्याची चर्चा शेतकºयांमध्ये जोर धरत आहे.वाशिम तालुक्यातील देपूळ परिसरातील वारा(जहा), बोरी काजळंबा, ऊमरा शम, खरोळा ईत्यादी गावांमध्ये शेतात मोठया प्रमाणात गहू, हरभºयासह भाजीपाल्याची लागवड शेतकºयांनी केली आहे. गत चार दिवसांपासून कमी -अधिक पडत असलेली थंडी, पहाटे पडण्यात येत असलेले धुके याचा विपरित परिणाम पिकांवर होवून अळयांचा, विविध रोगांचा प्रादूर्भाव पिकांवर होवू शकतो. यामुळे पिकांचे नुकसान होवू नये याकरिता शेतकरी वर्ग महागडी फवारणी करताना दिसून येत आहे. वाशिम तालुक्यातील देपूळ नजिक वारा सिंचन प्रकल्प तूंडूब भरल्यामूळे परिसरातील देपूळसह वारा जहॉगिर , उमरा शमशोद्दीन, काजळंबा, बोरी इत्यादी गावांमध्ये ६० टक्के शेतकºयांनी गहू, हरबरा ही रब्बी पिक घेतली. तर २० टक्के शेतकºयांनी टमाटा, मिरची, वांगी, काकडी इत्यादी भाजीवर्गीय पिक पेरली आहेत. परंतु गत चार दिवसापासून सतत पडत असलेल्या धूक्यामूळे रब्बी पिक व भाजीपालावर्गीय पिकावर विविध किडीचा प्रादूर्भाव होण्याच्या भीतीने शेतकºयांमध्ये हातचे पीक जाते की काय याची चिंता लागलेली दिसून येत आहे.
धुक्यामुळे पिकांवर होणारे परिणामधुक्यामुळे गव्हावर तांबेरा तर हरभºयावर घाट जाण्याची शक्यता शेतकºयांमध्ये वर्तविल्या जात आहे. तसेच भाजीपाल्यावर करपा जाण्याची भीती शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.
कृषी विभागाच्या भेटीगत चार दिवसांपासून पडत असलेल्या धुक्यांमुळे शेतकºयांचे नुकसान होवू नये याकरिता कृषी विभागाचे कर्मचारी परिसरातील शेतीची पाहणी करुन शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहेत. धुक्यामुळे पिकांचे नुकसान होवू नये याकरिता सकाळच्यावेळी शेतात धूर करणे, बुरशीनाशकाची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतिने देण्यात येत आहे. यासाठी कृषी सहायक घिमेकर, ढवळे शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहेत.