शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी; ज्येष्ठांना सतावतेय चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:43 AM

वाशिम : जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले होते. मात्र, लसीचा तुटवडा असल्याने या ...

वाशिम : जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले होते. मात्र, लसीचा तुटवडा असल्याने या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्तास थांबविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कुटुंबातील तरुणांचे लसीकरण केव्हा होणार, याची चिंता ज्येष्ठांना लागली आहे.

देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. दुसऱ्या लाटेतही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले; तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेलाही गती देण्यात आली. जिल्ह्यात १३१ केंद्रांमध्ये लसीकरणाची सुविधा आहे. मात्र, लसीचा तुटवडा जाणवत असल्याने कधी काही केंद्रे बंद ठेवण्यात येतात; तर कधी सर्वच केंद्रांमध्ये लसीकरण सुरू असते. १६ जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याला सुरुवात झाली. मात्र, काही दिवसांतच लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. युवकांचे लसीकरण नेमके केव्हा सुरू होणार याबाबत तूर्तास कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक हे चिंताग्रस्त असल्याचे दिसून येतात. कुटुंबातील युवकांचेही लसीकरण व्हावे, अशी अपेक्षा ज्येष्ठांमधून व्यक्त होत आहे.

००००

तरुण कामानिमित्त बाहेर जातात, त्यांनाही लवकर लस मिळावी !

ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे, ही बाब स्तुत्य व स्वागतार्ह आहे. मात्र, तरुणवर्ग हा कामानिमित्त बाहेर जात असल्याने त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे तरुणांनादेखील लवकर लस मिळावी.

- टी. एम. सरकटे

०००

कोरोनावर लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात येत असल्याने लसीकरणासाठी गर्दी होत आहे. दुसऱ्या लाटेत युवकांना कोरोना संसर्ग होत असल्याने युवकांनादेखील लवकरात लवकर लस मिळावे.

- संजयकुमार सरनाईक

००००००

युवकांसाठी १ मेपासून लसीकरणाला सुरुवात झाल्याने आनंदाचे वातावरण होते. परंतु, त्यानंतर अल्पावधीतच युवकांच्या लसीकरणाला ब्रेक मिळाला. युवकांनाही लवकर लवकर लस मिळावी, अशी अपेक्षा आहे.

- पांडुरंग सोळंके

00000