जिल्ह्यातील श्रेणी एकचे १७ व श्रेणी दोनचे ४१ अशा एकूण ५८ पशुवैद्यकीय दवाखाना व उपचार केंद्रांमधून जनावरांना वैद्यकीय सेवा दिली जाते. जिल्ह्यात चार लाखांच्या आसपास पशुधन असून, पशुधनाचे ‘आरोग्य’ सांभाळण्यासाठी श्रेणी एकच्या दवाखान्यावर एलडीओ दर्जाची २१ पदे मंजूर आहेत. पशुधन विकास अधिकाऱ्यांची काही पदे रिक्त असल्याने या पदांचा प्रभार कार्यरत अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.
वर्ग दोनची आठ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे अनेक वेळा प्रस्ताव पाठविण्यात आले. पाठपुरावाही सुरू आहे; परंतु रिक्त पदांचा प्रश्न ३ जूनपर्यंतही निकाली निघालेला नाही. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने जनावरांना विविध आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रिक्त पदे भरणे आवश्यक ठरत आहे.