०००००००
दुर्धर आजारग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा
वाशिम : हृदयरोग, किडनी व कर्करोग, आदी दुर्धर आजारांनी पीडित लाभार्थ्यांना औषधोपचाराकरिता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्रत्येकी १५ हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते. सन २०२१ मध्ये प्रस्ताव सादर केलेल्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.
0000
स्मशानभूमींसाठी निधीची प्रतीक्षा कायम
वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अतिरिक्त निधी मिळाल्यास स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवनाचा प्रश्न निकाली निघणार आहे. १५ कोटींचा अतिरिक्त निधी केव्हा मिळणार, स्मशानभूमीचा प्रश्न निकाली केव्हा निघणार? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
०००
तिबल सीट प्रवास; दंडात्मक कारवाई
वाशिम : दुचाकीवरून तिबल सीट प्रवास करणाऱ्या जवळपास ३७ जणांवर वाशिम शहर वाहतूक शाखेच्या चमूने १६ सप्टेंबर रोजी दंडात्मक कारवाई केली.
००००
प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त
वाशिम : मालेगाव, रिसोड, वाशिम तालुका आरोग्याधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त असल्यामुळे सेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत. रिक्त पदे भरण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य शाम बढे यांनी बुधवारी केली.