००००
युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण
वाशिम : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शासनमान्य प्रशिक्षण संस्थेत नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे.
0000
केनवड येथे युवा सप्ताहाचा समारोप
केनवड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १९ जानेवारी या कालावधीत केनवड परिसरातील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विविध स्पर्धा, उपक्रम घेण्यात आले. या सप्ताहाचा समारोप २० जानेवारी रोजी झाला.
००००
सात जिल्हा परिषद शाळांचे निर्जंतुकीकरण
रिठद : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार असल्याने रिठद परिसरात पूर्वतयारी केली जात आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या सात शाळांचे निर्जंतुकीकरण व स्वच्छता करण्यात आली आहे.
०००००
वनोजा, आसेगाव येथे आरोग्य तपासणी
रिठद : येथून जवळच असलेल्या आसेगाव पेन व वनोजा येथे प्रत्येकी एकाचा कोरोना चाचणी अहवाल २० जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी केली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने २१ जानेवारी रोजी केले.