.........................
गुरुमंदिर विश्वस्तांविरोधात तक्रार
कारंजा येथील गुरुमंदिर संस्थानच्या विश्वस्तांनी कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केल्याची तक्रार समाजसेवक शेखर काण्णव यांनी केली होती. त्यावरून ३१ मे २०१६ रोजी विश्वस्तांविरोधात कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासण्याकरिता वर्ग करण्यात आले. ते अद्यापपर्यंत प्रलंबित आहे.
................
औषधीचा बनावट पुरवठा आदेश
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून औषध निर्मात्या कंपन्यांना ६० लाखाच्या औषधीचा बनावट पुरवठा आदेश देऊन हेराफेरी करणारा फार्मसी अधिकारी कांताप्रसाद तिवारी याच्याविरुद्ध २८ जानेवारी २०१९ रोजी गुन्हे दाखल झाले. हे प्रकरणही आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासणीकरिता असून त्याचाही निपटारा अद्यापपर्यंत झालेला नाही.
....................
कोट :
आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासणीकामी येणाऱ्या प्रकरणांमधील घोटाळ्याच्या रकमेची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बारकाईने तपास करावा लागतो. बहुतांश प्रकरणे निकाली निघालेली असून, सद्यस्थितीत केवळ पाच प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणेही लवकरात लवकर निकाली काढली जातील.
- उदय सोयीस्कर
पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, वाशिम