वाशिम शहरात अकरावी प्रवेशासाठी एकूण १७ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यामध्ये १,३६० विद्यार्थी क्षमता असून दरवर्षी १०० टक्के प्रवेश या महाविद्यालयात हाेत आले आहेत. गतवर्षी केवळ ८ टक्के जागा रिक्त राहिल्या हाेत्या. यावर्षी अद्याप अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली नसली तरी विद्यार्थी प्रवेशासाठी तयार झाले आहेत.
...........
अकरावीसाठी गावांत प्रवेश का?
अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असण्यापाठीमागच्या कारणांचा शाेध घेतला असता वर्षातून ४ ते ५ वेळा महाविद्यालयात गेले की झाले. नंतर नाही गेलाे तरी चालते म्हणून ओढा आहे.
...........
ऑफलाईन प्रवेश याेग्य
दहावी उतीर्ण झालेले विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेणे अडचणीचे ठरते. त्यामुळे ऑफलाईन हाेत असलेले प्रवेशच याेग्य आहे.
- अनिल धुमकेकर, वाशिम
वाशिम शहरामध्ये ऑफलाईन पद्धतीनेच दरवर्षी प्रवेश घेतल्या जातात. प्रवेश घेताना मुलांना, पालकांना अडचणी येऊ नये याकरिता ऑफलाईन प्रवेशच याेग्य आहे.
- श्रीनिवास व्यास, वाशिम
..........
म्हणून घेताेय गावांत प्रवेश...
शहराच्या ठिकाणच्या काॅलेजमध्ये घेतल्या जाणारी फी व ग्रामीण भागातील फीमध्ये माेठ्या प्रमाणात तफावत आहे. यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे ठरविले.
व्ही.जे. वानखडे, विद्यार्थी
अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नाही. ग्रामीण भागात शिक्षणाची चांगली व्यवस्था झाली असून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ती परवडणारी असल्याने ग्रामीण भागात प्रवेश घ्यायचा आहे.
तुषार पाटील, विद्यार्थी
............
शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये १७
एकूण जागा १,२६०
गेल्या वर्षी किती अर्ज आले? १,२९०
किती जणांनी प्रवेश घेतला १,२३५
किती जागा रिक्त राहिल्या १२५