वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना, ग्रामीण भागातील बसफेऱ्या अद्याप सुरू झाल्या नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत असून, या प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत एसटीची सेवाही प्रभावित झाली होती. दुसरी लाट ओसरल्याने एसटी व रेल्वे सेवा सुरू झाली; परंतु ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंदच आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शहराच्या ठिकाणी येण्यासाठी ऑटो व अन्य खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. वाशिमसह इतरही आगारातील ग्रामीण बसफेऱ्या बंदच आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातील बसफेऱ्यांना प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे जिल्ह्यातील आगारांकडून सांगण्यात येते. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसफेऱ्यांचे नियोजन असते, असेही आगारांनी स्पष्ट केले.
०००००००००००००
वाशिम आगारातील एकूण बस ४९
कोरोनाआधी दररोज धावणाऱ्या बस ४९
सध्या सुरू असलेल्या बस २५
०००००००
१५ हजार किमी प्रवास; पण फक्त शहरांचाच !
१) वाशिम आगारातील ४९ पैकी सध्या २५ बस सुरू आहेत. या बसचा दैनंदिन जवळपास १५ हजार किमी प्रवास आहे.
२) या सर्व बस अकोला, रिसोड, नांदेड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आदी शहरी भागांसाठीच आहेत.
३) एकही बस ग्रामीण भागासाठी नसल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना ऑटो व अन्य खासगी प्रवासी वाहनातून प्रवास करावा लागत आहे.
००००००००००००
खेडेगावात जाण्यासाठी ‘ऑटो’चा आधार!
ग्रामीण भागात, खेडेगावात जाण्यासाठी ऑटो सुरू आहेत. एसटी बस बंद असल्याने ऑटोमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने प्रवासी भाडेदेखील वाढविण्यात आल्याचा फटका ग्रामीण प्रवाशांना बसत आहे.
००००
कोट बॉक्स
वाशिम आगारात ४९ बस आहेत. यापैकी २५ बस सुरू आहेत. अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नांदेड आदी शहरी भागासाठी बस सुरू आहेत. ग्रामीण भागात प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसफेऱ्यांचे नियोजन असते.
- विनोद इलामे
आगारप्रमुख, वाशिम
०००००००००००
खेडेगावांवरच अन्याय का?
कोट
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू होणे अपेक्षित आहे. वाशिम- टणका बसफेरी बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
- रमेश पाईकराव, प्रवासी
०००००
ग्रामीण भागात अद्याप एसटी सुरू झाली नसल्याने प्रवाशांना ऑटो व इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. शहरी बसफेऱ्या सुरू असल्याने ग्रामीण बसफेऱ्यादेखील सुरू कराव्या.
- शिवराम कांबळे, प्रवासी