शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

समुदाय वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:41 PM

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक हे समुदाय वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद शिक्षकांनी गावातील चावडी, समाजमंदिर किंवा मोकळ्या जागेत समुदाय वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना (मोबाईल किंवा अन्य साधने नसणाऱ्या) शैक्षणिक अध्यापनाचे काम करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सहा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांना दिले.कोरोना विषाणू संसर्गाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे. परंतू, ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, संगणक, टॅब किंवा अन्य साधने नाहीत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा विद्यार्थ्यांनादेखील शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अवर सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या सूचनेनुसार, विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांनी संबंधित शाळेत उपस्थित राहून आवश्यक ती खबरदारी घेत गावातील मोकळ्या जागेत, समाजमंदिर, चावडी, गावातील उपलब्ध सभागृह, क्रीडांगण आदी ठिकाणी पाच ते दहा विद्यार्थी मिळून ‘समुदाय वर्गा’च्या माध्यमातून शैक्षणिक अध्यापनाचे काम करावे लागणार आहे. सर्व शिक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. समुदाय वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविताना गर्दी होणार नाही, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये आणि लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढणार नाही, यासंदर्भात काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक हे समुदाय वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत.ज्या विद्यार्थ्यांकडे आॅनलाईन शिक्षणासाठी मोबाईल किंवा अन्य साधने उपलब्ध नाहीत, त्यांना समुदाय वर्गाच्या माध्यमातून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत शिकवावे, अशा सूचना गटशिक्षणाधिकाºयांना केल्या.-अंबादास मानकर,प्राथमिक शिक्षणाधिकारी

 

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षण