लोकमत न्युज नेटवर्कमंगरुळपीर : वडार समाजातील समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.मंगरूळपीर येथे २५ जानेवारी रोजी स्थानीक लालबहादुर शास्री भवन येथे वडार समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा पार पडला या मेळाव्याच्या उदघाटक वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड अध्यक्षस्थानी वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष राकेश विटकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन बहुजन विकास आघाडी अध्यक्ष वामन शेळके,प्रमुख वक्ते डाॅ.भरत विटकर,प्रमुख अतिथी मारोतीराव सोळंके,ललीता धनवटे नगराध्यक्ष डाॅ. गझाला खान,अॅड मारुफ खान,महादेव कुसळकर गणेश पवार वडार समाज संघ जिल्हाध्यक्ष सुखदेवराव फुलारे,भवलाल पवार,डा.श्रावण रॅपनवाढ, संजय देवकर आदी मान्यवर उपस्थीत होते. यावेळी पुढे बोलतांना संजय राठोड म्हणाले वडार समाज देशात ४ ते ५ कोटी आहेत वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणार्या या समाजाला महाराष्र्ट वगळता ईतर राज्यात अनुसुचीत जातीचे आरक्षण आहे या समाजाला महाराष्र्टात अनुसुचीत जातीत समाविष्ठ करण्याची मागणी असुन त्यांची ही मागणी शासनदरबारी मांडुन त्याचा पाठपुरावा करणार आहे यावेळी डाॅ. भरत विटकर यांनी समाजाची व्यथा पालकमंत्र्यासमोर मांडतांना समाज बांधवानी न्याय मागण्यासाठी एकत्रीत यावे असे समाजाला आवाहन केले लातुर जिल्ह्यातील अहमदपुर तालुक्यातील टेभुर्णी येथील कोमल पवार या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या करण्यात आली या घटनेची दखल घेऊन प्रकरणाच्या तपासात दिरंगाई करणार्या पोलीस अधिकार्याना १ फेब्रुवारीपर्यत निलंबीत करण्याची मागणी पालकमंत्री यांचेकडे केली आणी या मागणीसाठी वडार समाज बांधवांनी मंगरुळपीर शहरातून मोर्चा काढून दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी उपविभागिय अधिकारी यांना लेखी निवेदनही सादर करन्यात आले. या प्रकरणी ५० हजार समाजबांधवाना घेऊन नवी दिल्ली येथे मोर्चा काढणार असल्याचा ईशारा दिला.
वडार समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार - संजय राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 7:39 PM
मंगरुळपीर : वडार समाजातील समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
ठळक मुद्देमंगरुळपीर येथे पार पडला वडार समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा