मंगरुळपीर : भारतीय लगोरी महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र लगोरी असोसिएशनच्या पुढाकाराने दुसरी इंडियन लगोरी प्रिमीयर लीग नुकतीच पनवेल मुंबई येथे संपन्न झाली. यामध्ये विजेता संघाचा सत्कार मंगरुळपीर येथे करण्यात आला.
या स्पर्धेत दहा सघामध्ये सामने खेळले गेले. पाच दिवशीय लिगमध्ये वाशिम जिल््यातील यशवंतराव चव्हाण विद्यालय,मंगरुळपीर येथील खेळाडु शाम ढोबळे, देवेश महाकाळ, भुषण राऊत, ओम निलटकर, अथर्व जायभाये, रोहन काळे, रितेशा पेनोरे, गौरव राऊत, उल्हास पाखरे, हेरंब नर्दे, इत्यादींचा विजेता पंजाब संघामध्ये सहभाग होता. अंतीम सामन्यामध्ये शाम ढोबळे या खेळाडूने उत्कृष्ट कामगीरी करुन बेस्ट प्लेअर अवार्ड मिळविला. विजेता सघाचे प्रशिक्षक गजानन विटकरे होते. विजयी संघातील खेळाडूंचा व प्रशिक्षकाचा सत्कार माजी क्रिडा राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी शाल, श्रीफळ व पारितोषीक देवुन सत्कार केला. या सत्कार समारंभाला विठ्ठलराव गावंडे, प्रा.अरुणभाऊ इंगळे, रमेशभाऊ नावंघर, सतिष बाहेती, तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व क्रिडा प्रेमी हजारोंच्या संख्येत उपस्थित होते. विजयी संघाचे क्रिडा उपसंचालक प्रतिभाताई देशमुख, जिल्हा क्रिडा अधिकारी प्रदीप शेटी , वाशिम क्रिडा अधिकारी पांडे, किशोर बोंडे, चंदक्रांत उप्पलवार, मिलींद काटोलकर, व सर्व कर्मचारी क्रिडा कार्यालय वाशिम यांनी सत्कार केला. विजयी संघातील खेळाडूंचा व प्रशिक्षक गजानन विटकरे यांचा मंगरुळपीर पोलिस स्टेशनच्या वतीने सुध्दा शाल,श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मंगरुळपीरचे पोलिस उप अधिक्षक सुधाकर यादव व ठाणेदार रमेश जायभये यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले. विजयी खेळाउूंना यादव यांनी उज्वला भविष्याकरिता मार्गदर्शन केले.