शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

वाशिम जिल्हा परिषदेचा ४३ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 5:07 PM

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी २१ मार्च रोजी अर्थसंकल्पीय सभेत सन २०१८-१९ चे सुधारित अंदाजपत्रक ४३ लाख ४३ हजार ७८२ रुपये शिलकीचे सादर केले.

ठळक मुद्देअर्थ समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी सलग चवथ्यांदा जिल्हा परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला.सन २०१८-१९ या वर्षात विविध मार्गाने ५ कोटी ६३ लाख ५८ हजार ७८२ रुपयांचा महसूल येणार.५ कोटी ५० लाख ३८ हजार रुपये विविध विभागाच्या योजनांवर खर्च होणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला.

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी २१ मार्च रोजी अर्थसंकल्पीय सभेत सन २०१८-१९ चे सुधारित अंदाजपत्रक ४३ लाख ४३ हजार ७८२ रुपये शिलकीचे सादर केले. या अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर बहुमताने मंजूर झाले. जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात बुधवारी अर्थसंकल्पीय सभा पार पडली.  पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख होत्या. व्यासपिठावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीणा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस, सभापती सर्वश्री विश्वनाथ सानप, पानुताई जाधव, सुधीर पाटील गोळे, यमुना जाधव  यांची उपस्थिती होती. यावेळी अर्थ समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी सलग चवथ्यांदा जिल्हा परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला.  सन २०१८-१९ या वर्षात विविध मार्गाने ५ कोटी ६३ लाख ५८ हजार ७८२ रुपयांचा महसूल येणार असून, ५ कोटी ५० लाख ३८ हजार रुपये विविध विभागाच्या योजनांवर खर्च होणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चेची मागणी लावून धरली. सविस्तर चर्चा झाल्यानंतर अर्थसंकल्प मंजूर झाला. बांधकाम विभागासाठी जवळपास १.७३ कोटीची तरतूद असून, शिक्षण २२ लाख रुपये, आरोग्य २५.६६ लाख रुपये, कृषी २१.६२ लाख रुपये, पशु संवर्धन ५ लाख, लघु सिंचन ५५ लाख रुपये, समाजकल्याण २७.२८ लाख, महिला व बालकल्याण १२.७२ लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे. यावेळी सन २०१७-१८ मधील शिलाई मशीनचे वाटप झाले नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदBudgetअर्थसंकल्प