सुजलाम्, सुफलाम् अभियान : कामांचे नियोजन करण्याच्या सूचनालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविले जात आहे. या अभियानांतर्गत भारतीय जैन संघटना यांच्यातर्फे २८ जेसीबी मशिन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सध्या कामे नसल्याने जवळपास १५ जेसीबी मशिन जागेवरच थांबून आहेत.दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाते. या कामी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला आहे. सुरूवातीच्या टप्प्यात जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव व कारंजा तालुक्यातील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. बीजेएसच्यवतीने २८ जेसीबी मशिन उपलब्ध करून दिल्या आहेत. या अभियानाचा शुभारंभ १३ नोव्हेंबर रोजी झाला असून, तेव्हापासून पहिल्या व दुसºया टप्प्यात रिसोड तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरीत पाचही तालुक्यात समतल चर खोदकाम यासह जलसंधारणाची विविध कामे पूर्ण करण्यात आली. सध्या जलसंधारणाची कामे उपलब्ध नसल्याने १५ जेसीबी मशिन जागेवरच थांबून आहेत. यासंदर्भात बीजेएसच्या समन्वयकांनी जलसंधारणाची कामे उपलब्ध करण्याची मागणी कृषी विभागाकडे नोंदविली आहे. या पृष्ठभूमीवर पाणलोटातील ढाळीच्या बांधाची कामे त्वरीत उपलब्ध करून सदर मशिन कामांवर जातील, याचे नियोजन तात्काळ करावे आणि तसा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला सादर करावा, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी २ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सहाही तालुका कृषी अधिकारी तसेच वाशिमचे उपविभागीय कृषी अधिकाºयांना दिल्या.भारतीय जैन संघटनेच्या २८ जेसीबीपैकी आज रोजी जवळपास १५ जेसीबी जागेवरच आहेत. तलावातील गाळ काढणे, ढाळीच्या बांध बंदिस्ती किंवा सलग समतल चर खोदकाम आदी कामांसाठी जेसीबी मशिनचा वापर केला जातो. या अनुषंगाने ढाळीचे बांध बंदिस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यताही मिळालेली आहे. त्यामुळे जेथे जमिन, शेत हे रिकामे आहे, तेथे जलसंधारणाची कामे सुरू करण्याची मागणी बीजेएसच्या समन्वयकांनी कृषी विभागाकडे नोंदविली आहे. जेसीबीची मागणी नोंदविण्याचे आवाहनआजच्या स्थितीत जरी जलसंधारणच्या कामांसाठी १०० टक्के शेतजमिन किंवा अन्य ठिकाणे उपलब्ध नसतील; परंतू २० ते २५ टक्के शेतजमिन रिकामी असून, तेथे ३१ मार्च २०१९ पूर्वी कामे पूर्ण होण्यासाठी तातडीने कामे सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करावी, सदर सर्व कामांसाठी आणखी काही जेसीबीची मागणी भारतीय जैन संघटनेच्या तालुका समन्वयकाकडे नोंदवावी, असे आवाहनही जिल्हा समन्वयकांनी केले आहे.
सुजलाम्, सुफलाम् अभियान : कामाअभावी २८ जेसीबी मशिन जागेवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 3:05 PM