लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: मानोरा तालुक्यातील कुपटा गाव माहेर असलेल्या महिलेच्या तक्रारीवरून मानसिक व शारीरिक छळप्रकरणी मानोरा पोलिसांनी सासरच्या सहा जणांविरुद्ध २९ जुलै रोजी गुन्हे दाखल केले.कुपटा येथील नजराना नाईद अब्दुल राजीक (१९) रा. दत्तवाडी, मुंब्रा, मुंबई ह.मु. कुपटा ता. मानोरा यांच्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळीकडून टेलरिंग व्यवसायासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. पैशाची पूर्तता न झाल्याने तिला शारीरिक व मानसिक छळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून आरोपी अब्दुल राजीक अ. गणी, अब्दुल गणी अ. समद, मकसुदाबी अब्दुल गणी, साबेराबी वि.अ. समद, रुबीनाबी ज. जिया उलहक, जिया उलहक हकीम साहेब सर्व रा. जुने हायवे, मुंब्रा, जि. ठाणे यांच्याविरुद्ध कलम ४९८, अ, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेचा छळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 2:48 AM
लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: मानोरा तालुक्यातील कुपटा गाव माहेर असलेल्या महिलेच्या तक्रारीवरून मानसिक व शारीरिक छळप्रकरणी मानोरा पोलिसांनी सासरच्या सहा जणांविरुद्ध २९ जुलै रोजी गुन्हे दाखल केले.कुपटा येथील नजराना नाईद अब्दुल राजीक (१९) रा. दत्तवाडी, मुंब्रा, मुंबई ह.मु. कुपटा ता. मानोरा यांच्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळीकडून टेलरिंग व्यवसायासाठी ५ लाख रुपयांची मागणी ...
ठळक मुद्देमानसिक व शारीरिक छळप्रकरण सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल