कामरगाव (जि. वाशिम): येथील ३0 वर्षीय विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. कामरगाव येथील उषा गणेश हळदे ही विवाहित महिला सकाळी नैसर्गिक विधीसाठी प्रसाधनगृहात गेली असता तेथे असलेल्या सापाने महिलेच्या पायाला चावा घेतला. महिलेने याबाबत पतीला माहिती दिली. त्यानंतर पती गणेश हळदे यांनी महिलेस तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी र्मग दाखल केला आहे.
संर्पदंशाने महिलेचा मृत्यू
By admin | Published: July 15, 2015 1:39 AM