लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पतीच्या निधनानंतर समर्थपणे संसाराचा गाडा हाकणाऱ्या शेतकरी महिलांसह प्रयोगशिल महिला शेतकऱ्यांचा कृषीदिनाचे औचित्य साधून ‘शेतमाऊली सन्मान सोहळा’ या उपक्रमांतर्गत सोमवार, १ जुलै रोजी सन्मान करण्यात आला. आधूनिक तंत्रज्ञानाची कास धरून कृषीमालाचे उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले.वाशिमच्या नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, जि. प. सदस्य गजानन अमदाबादकर, रिसोड पंचायत समितीचे उपसभापती महादेव ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रल्हाद शेळके, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विकास गौड, करडा कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ आर.एस. डवरे, महाबीजचे डॉ. घावडे, प्रगतशील शेतकरी केशव भगत उपस्थित होते.याप्रसंगी यमुनाबाई उगले, आशाबाई वाठ, शांताबाई कुदळे, सरस्वती खंडागळे, साधनाबाई आवताडे, अरुणा राठोड, नंदा पानबरे, कुसुम मनवर, अनिता भोयर, निशा जाधव, ललिता थुतांगे, सुलोचना बगाळे आदी प्रयोगशिल महिला शेतकºयांचा सन्मान करण्यात आला. जि.प. अध्यक्ष देशमुख म्हणाल्या, कृषी दिनानिमित्त आयोजित चर्चासत्र व उपक्रमांमधून शासकीय योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळते. शेतकºयांनी याठिकाणी मिळणाºया कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा उपयोग शेतीमध्ये करावा. कृषी विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती घेवून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.कृषी सभापती सानप, अमदाबादकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन शेळके यांनी करून आभार मानले.
कृषीदिनी झाला शेतमाऊलींचा सन्मान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 4:52 PM