लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होत असून, जिल्ह्यात वाशिम व कारंजा विधानसभा क्षेत्रात चार ठिकाणी महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. या चार मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणुकीसाठी कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचारी या महिलाच आहेत.लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र म्हणून याला 'सखी मतदान केंद्र' असे नाव ठेण्यात आले आहे. सखी मतदार केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी हे महिलाच आहेत. वाशिम शहरातील शिवाजी विद्यालय खोली क्रमांक तीन येथे ६०२ मतदार व बाकलीवाल विद्यालय खोली क्रमांक सात येथे ६९२, काळी कारंजा येथील जिल्हा परिषद शाळा खोली क्रमांक दोन येथे १२७० आणि किन्हीरोकडे येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र येथे ७५६ मतदार आहेत. या चारही मतदान केंद्रांचे व्यवस्थापन महिलांच्या हाती आहे.
Maharashtra Electiom voting live : वाशिम जिल्ह्यात चार मतदान केंद्रांचे व्यस्थापन करताहेत महिला अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 2:21 PM