कार्यक्रमाच सूत्रसंचालन सोनालीताई वाघमारे यांनी केले. इतर महिलांनी महिला दिनाच्या निमित्त आपले विचार व्यक्त केले. यावेळी पद्मा जागृत, मीनाक्षी धामणकर, सोनाली वाघमारे, सीआरपी ज्योती ढेपे, अंगणवाडी सेविका मंगला साबळे, आशा वर्कर प्रेमा बाईस्कार, ग्राम संघाच्या अध्यक्षा ज्योती आगळे, ग्राम संघाच्या सदस्य वर्षा गावंडे, कृषी मित्र सदस्य शशिकला जाधव, माधुरी आगळे, पद्मा जागृत, गीताबाई बाईस्ककार, सुवर्णा साबळे यांच्या उपस्थितीत महिला दिनाचा कार्यक्रम ग्रामपंचायतमध्ये साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी महिलांनी एकत्र येऊन महिलांच्या उत्कर्षासाठी मदत व्हावी म्हणून शासनाच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेता येतो आणि विविध योजनेच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मिती तसेच इतरही व्यावसायिक बाबी स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून करता येतात. याला आर्थिक साहाय्य म्हणून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. या करता सर्वांनी एकत्र येऊन आपल्या गरजेनुसार व्यवसायाची निवड करावी आणि त्याला आवश्यक असणारे मार्गदर्शन आमच्या माध्यमातून देत राहू असे आश्वासन यावेळी कार्यक्रमाच्या आयोजिका सोनाली वाघमारे यांनी उपस्थित महिला मंडळांना केले.
तऱ्हाळा येथे महिला दिन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:40 AM