क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात झाली. डॉ.सोनिया भोणे यांनी गरोदर माता, स्तनदा माता, बालकांची मोफत तपासणी करून औषध वितरित केले. सोबतच रक्तातील हिमोग्लोबिन व मधुमेह तपासणी करून औषधीचे वितरण करण्यात आले. मोबाइल मेडिकल युनिटच्या या उपक्रमातून जिल्ह्यातील ४८ गावांमध्ये रुग्णांना मोफत सुविधा पुरवत असल्याची माहिती समन्वयक अमोल देशमुख यांनी दिली.
यावेळी ग्रामीण महिला गरोदर माता, स्तनदा माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सोबतच चाकोली येथील रेखा मोरे, अंगणवाडीसेविका रेणुका सानप, धोडप बु. येथील शिवगंगा खडसे, वनिता बोडखे, अंगणवाडीसेविका रंजना बोडखे, वर्षा बुंदे आदी आदींची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वितेसाठी आरोग्यसेविका सीमा कांबळे, औषधी निर्माण अधिकारी तौसिब खान, प्रयोगशाळा तंत्रज्ञ गजानन कापसे, वाहन चालक सुखदेव काळबांडे, राजू हजारे यांनी प्रयत्न केले.