- नारायण अव्हाळेलोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील अरक येथील यात्रेत लेकीबाळींचा सन्मान करण्याची परंपरा गत १० वर्षांपासून जोपासली जात आहे. यावर्षीही महाशिवरात्रीच्या पर्वावर या यात्रेत लेकीबाळींचा सन्मान केला जाणार आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, या भुमीत याञेची रेलचेल आणि प्रत्येक याञेचे वेगवेगळे महत्व आहे. रक येथील यात्रेत महिलांना सन्मानीत करुन एकात्मतेचे दर्शन घडविले जाते.अरक येथे एका दशकापासून जगदेश्र्वर संस्थानच्यावतीने याञेस प्रारंभ करण्यात आला. तसे अरक हे गाव विविध जाती धर्मात विखुरलेले असून, राजकीय गटतट, सर्वच पक्षाची बॅनरबाजी आणि एका गावात राहूनही चांगल्या किंवा वाईट प्रसंगातही हेवेदावे. मात्र १० वर्षापूूर्वी जगदेश्र्वर संस्थानच्यावतीने महाशिवराञी निम्मित एका कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला गावातील सर्व जातीधर्माच्या लेकीबाळी कोणकोणत्या गावात आहेत, याचा मागोबा घेतला आणि सुरूवात झाली लेकीबाळींना याञेला आनण्याची. प्रत्येक घरात कासोदूर असलेली मुलगी दिसू लागल्याने, महाशिवराञीला जणू दिवाळीच आहे का?असे जाणवू लागले. माहेरी आपला सन्मान होतोय या भावनेतून गावातील लेकीबाळी यात्रेत मोठ्या आनंदाने सहभागी होतात. जगदेश्र्वर संस्थानेही कोणताही भेदभाव न ठेवता लेकींचा साडी चोळी देवून बहीन-भावाच्या नात्या प्रमाणे गोड भोजनाची मेजवानी दिली. एकात्मतेचे दर्शन घडविणारी ही परंपरा आजही जोपासली जात आहे. ५ मार्च रोजी अरक येथे ही यात्रा भरणार असून कासोदुर असलेल्या लेकीबाळी यात्रेला येणार आहेत.
अरक येथील यात्रेत केला जातोय लेकीबाळींचा सन्मान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:36 PM