वाशिम: मालेगाव पोलीस स्टेशनच्या आवारातील महिला तक्रार निवारण केंद्राच्या दोन कर्मचारी युवतींचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अरुण अशोक सांगळे या कर्मचार्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ माजली आहे. एकीकडे शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. महिलांचे घरगुती प्रकरणे आपसात करण्यासाठी शासनामार्फत मोठमोठय़ा स्वयंसेवी संस्थांना कंत्राट पद्धतीने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रातच तक्रार निवारण करणार्या महिलांनाच केंद्राच्या जबाबदार कर्मचार्याकडून छेडखानीच्या सामना करावा लागला असल्याची बाब मालेगाव येथे उघडकीस आली. त्यामुळे या महिला तक्रार निवारण केंद्राच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत १५ ऑक्टोबर रोजी रात्री १0 च्या सुमारास पीडित युवतीने आरोपी अरुण अशोक सांगळेविरुद्ध फिर्याद दिली की, आरोपी या केंद्रातील दोघींच्या पगाराचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच ईल चाळे करून शरीर सुखाची मागणी करीत आहे. तसेच त्यांच्या खोलीवर येऊन मारण्याची धमकी दिली आहे. यावरून मालेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार के. आय. मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सविता बोधनकर करीत आहेत.
महिला तक्रार निवारण केंद्रातच महिलांचा विनयभंग
By admin | Published: October 17, 2015 1:52 AM