वाशिम: दिवसेंदिवस वाढत चालेले विनयभंग, बलात्कार, लुटमार व तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये होणारी रॅगींग रोखण्याच्या दृष्टीने माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यार्थीनी त्याचबरोबर महिला कर्मचारी या सर्वांना स्वयंसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यबाबतचे निवेदन वाशिम पंचायत समितीच्या माजी सभापती मधूबाला सुभाष चौधरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.सदर निवेदनानुसार विद्यार्थीनी, महिला कर्मचारी यांना स्वत:चे संरक्षण करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. महाराष्ट्रामध्ये बर्याच जिल्हयात महिला व विद्यार्थीनींना प्रशिक्षण देणे चालु असल्याची माहिती असून या धर्तीवर वाशिम जिल्हयामधील शाळेच्या विद्यार्थीनी शासकीय निमशासकीय महिला कर्मचारी या जर स्वंयसंरक्षण करण्यास पटाईत झाल्या तर महिला सुध्दा झपाटयाने प्रगतीकडे वाटचाल कररतीलवाशिम जिल्हयातील विद्यार्थीनींना व शासकीय महिला कर्मचार्यांना शासनाकडून आत्मसंरक्षणाकरिता प्रशिक्षण देण्याची मागणी माजी पंचायत समिती सभापती वाशिम यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनाची प्रतिलीपी महिला बालकल्याण समिती सभापती जिल्हा परिषद वाशिम यांच्याकडे दिली.
महिला संरक्षण प्रशिक्षण
By admin | Published: July 01, 2014 10:06 PM