किनगावजट्टू : लोणार पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या किनगावजट्टूयेथील बंद पडलेले महिला शौचालय ग्रामस्वच्छता सामितीच्या पुढाकारानेपुन्हा सुरू करण्यात आले आहे.किनगावजट्टू येथील आरोग्य उपकेंद्रासमोर तीन वर्षापूर्वीपासूनशासनाचेवतीने महिलांकरीता सहा शौचालयाचे बांधकाम करण्यात आले होते. परंतुसंबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे पाणी व लाईटअभावी हे शौचालय बंदच होते.दरम्यान जि.प.शाळेसमोर व आरोग्य उपकेंद्रासमोर या महत्वाचे रस्त्यावरमहिला उघड्यावर शौचास बसत असल्याने, या रस्त्याने दुर्गंधी पसरत होती.त्यामुळे येथील चार वर्षापासून कार्यरत असलेले स्वच्छता समितीचे अध्यक्षराजेश नागरे व त्यांचे सहकारी राजु सोरमारे, भगवान मुळे, गजानन गायकवाड,मय्या तरवडे आदींनी पुढाकार घेऊन संपूर्ण शौचालयाची साफसफाई करुनतात्पुरती पाण्याची व लाईटची व्यवस्था केली आणि शौचालयाच्या भिंतीला फलकलावून हे शौचालय पुन्हा सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरीलथोड्याफार प्रमाणात दुर्गंधी कमी होण्यास मदत झाली आहे. परंतु स्थानिकग्रामपंचायतने कायमस्वरुपी पाणी व्यवस्था व लाईटची व्यवस्था करुन देण्यातयावी, अशी मागणी सुद्धा ग्रामस्वच्छता समितीने ग्रामपंचायतला केली आहे.
ग्राम समितीच्या पुढाकाराने महिला शौचालय सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 1:34 PM