शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
2
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सुज्ञ..." 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
4
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
5
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
6
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
7
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
8
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
9
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
10
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
11
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
12
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
13
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
14
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
15
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
17
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
18
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
19
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
20
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!

नाफेडच्या केंद्रावर महिला शेतकऱ्यांचा तूर कल्लोळ

By admin | Published: May 12, 2017 5:46 PM

शासनाने नाफेडच्या खरेदीला ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी बाजार समित्यांमधील नाफेडच्या खरेदी केंद्रांवर गर्दी करीत असतानाच

वाशिम: शासनाने नाफेडच्या खरेदीला ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी बाजार समित्यांमधील नाफेडच्या खरेदी केंद्रांवर गर्दी करीत असतानाच आता महिला शेतकऱ्यांनीही या ठिकाणी झुंबड केली असून, नाफेडकडून टोकण मिळविण्यासाठी या महिला धडपड करताना दिसत होत्या. यंदा जिल्ह्यासह राज्यभरात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले; परंतु बाजारात व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याने शेतकरी अडचणीत आले. अशात शासनाने नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करून. त्या ठिकाणी ५ हजार ५० रुपये प्रति क्विंटलच्या हमीदराने खरेदी सुरू केली. तथापि, या केंद्रांवर मोजणीची संथ प्रक्रिया, साठवणुकीची अडचण आणि बारदाण्याचा तुटवडा आदि कारणांमुळे खरेदी वारंवार खंडित झाली आणि २२ एप्रिलपर्यंतच्या वाढीव मुदतीच्या काळापर्यंत नाफेडकडे तूर विक्रीसाठी टाकणाऱ्या हजारो शेतकऱ्यांची तूर बाजार समितीच्या ओट्यांवरच पडून राहिली. यामुळे जिल्हाभरात तूर कल्लोळ सुरू झाला. याचदरम्यान राज्य शासनाने केंद्राकडे तुरीच्या खरेदीसाठी मुदतवाढ मागितली आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांनी त्याला हिरवा कंदिल देताना एक लाख टन तुरीची खरेदी ३१ मेपर्यंत करण्याची मूभा महाराष्ट्र शासनाला दिली. त्याची घोषणा मु्ख्यमंत्र्यांनी केल्यानंतर नाफेडच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची तोबा गर्दी सुरू झाली. त्यामध्ये वाशिम येीिल बाजार समितीमध्ये शुक्रवारी महिला शेतकरी आणि शेतकरी कन्याही नाफेडकडे टाकलेल्या तुरीचे टोकण मिळविण्यासाठी शुक्रवारी धडपड करताना दिसल्या.