शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

‘लेखा’च्या कामकाजाचा तिढा अखेर सुटला!

By admin | Published: March 23, 2017 2:17 AM

कर्मचा-यांच्या आंदोलनाची सांगता

वाशिम, दि. २२- शासनस्तरावर प्रलंबित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेतील लेखा संवर्गीय कर्मचार्‍यांनी १५ मार्चपासून पुकारलेल्या लेखणी बंद आंदोलनाची यशस्वी सांगता बुधवारी करण्यात आली. यामुळे ऐन मार्च एण्डिंगमध्ये रखडलेली लेखाविषयक कामे आता पूर्ववत होतील, यात शंका नाही.सहायक लेखा अधिकार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे राजपत्रित दर्जा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लेखा कर्मचार्‍यांनी विविध टप्प्यात आंदोलन पुकारले. १५ मार्चपासून लेखणी बंद आंदोलन सुरू असल्याने लेखाविषयक कामकाज ठप्प होते. वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील लेखा कर्मचार्‍यांची लेखणी बंद असल्याने विविध देयके रखडली होती. यामुळे निधी अखर्चित राहण्याची भीतीदेखील वर्तविली जात होती.२२ मार्च रोजी मंत्रालयात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मंत्र्यांसोबत चर्चा झाली आणि ग्रेड पे, पदोन्नतीची मागणी मान्य केल्याने तसेच वर्ग दोनच्या मागणीचा विचार करण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याने संघटनेने आंदोलन मागे घेतले. वाशिम जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष रामानंद ढंगारे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनाला जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला होता. आमदार अमित झनक, जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी येवले यांच्यासह सर्व विभागप्रमुख, जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन मंडपाला भेटी देऊन लेखा कर्मचार्‍यांशी संवाद साधला होता. २२ मार्च रोजी मंत्रालयात यशस्वी चर्चा झाल्याने लेखणी बंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष ढंगारे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.