कारंजा लाड (जि. वाशिम) : परवाना न बाळगणार्या दुचाकीचालकांविरुद्ध कारंजा शहर पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली असून, या मोहिमेंतर्गत शनिवारी वाहतूक पोलिसांनी ३४ दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून प्रत्येक एक हजार रुपये याप्रमाणे ३४ हजार रुपये दंड म्हणून वसूल केले. नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाल्यापासून शहराच्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात दुचाकी धावू लागल्या आहेत. यातील कित्येक दुचाकीधारक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून परवाना न बाळगताच फिरत आहेत. हे दुचाकीधारक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव दुचाकी पळवितात. एखादेवेळी अपघात घडून जिवितहानी होण्याची शक्यता त्यामुळे वाढली आहे. या पृष्ठभूमीवर शहर पोलिसांच्यावतीने शनिवारी परवाना न बाळगणार्या दुचाकीचालकांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत एकाच दिवशी ३४ दुचाकीचालकांकडून प्रत्येकी एक हजार रूपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत वाहतूक पोलीस जमादार विजय राठोड, संतोष राठोड, शंकर राख, मोहम्मद गवळी, जितेंद्र पाटील, प्रवीण गवांदे सहभागी झाले होते.
परवाना न बाळगणा-या दुचाकीचालकांवरकारवाई
By admin | Published: July 06, 2015 2:10 AM