---------
हवामान यंत्र कुचकामी
वाशिम: सुमारे चार वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्यासाठी पार्डी ताड येथे स्कायमेट कंपनीच्यावतीने स्वयंचलित हवामान यंत्र स्थापित करण्यात आले; परंतु हे यंत्र नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळ शेतकऱ्यांना या हवामान यंत्राचा कोणताही फायदा होत असल्याचे दिसत नाही.
-------
सांडपाणी रस्त्यावर; आरोग्याला धोका
दगड उमरा: वाशिम तालुक्यातील दगड उमरा येथे नाल्यांची साफसफाई करण्याबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याने गुरुवारी सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसले. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
--------------
पोलिसांकडून वाहनांची तपासणी
वाशिम: काजळेश्वरमार्गे परजिल्ह्यातून कारंजा तालुक्यात येणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. याअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. गेल्या चार दिवसांत अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
---------
इंझोरी परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम: मानोरा तालुक्यातील इंझोरीसह परिसरात खरीप पेरणी, बीज प्रक्रिया बीबीएफ तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत सोमवारपासून कृषी विभागाकडून विविध ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग राखून सभांचे आयोजन करण्यात येत आहे.
----------------
नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा
वाशिम: अनसिंग परिसरात गतवर्षी अवकाळी पावसामुळे झालेल्या सोयाबीन पीक नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षा येथील शेतकऱ्यांना आहे. वर्ष उलटले तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची माहिती घ्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी केली.
------------