शहरातील नालंदानगराजवळील शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची मागील काही वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्याने नालंदानगरातील नागरिकांना चालणेदेखील मुश्कील झाले होते. सद्य:स्थितीत शासकीय स्त्री रुग्णालय हे कोविड सेंटर असल्यामुळे कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची दैनंदिन ये-जा सुरू राहते. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. नालंदानगराच्या नागरिकांच्या मागणीची दखल घेत खासदार भावना गवळी यांनी या रस्त्याकरिता निधी उपलब्ध करून नागरिकांना मोठा दिलासा दिला. या रस्त्याच्या कामाला १ जून रोजी सुरुवातही करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, उपजिल्हाप्रमुख महादेवराव सावके, रामदास मते पाटील, गजानन भांदुर्गे, गजानन ठेंगडे, अतुल वाटाणे, आम्रपाली ताजने, प्रभाकर काळे, राजाभैय्या पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:30 AM