कारंजा लाड - कारंजा तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जवळपास ३ कोटी ५० लाख रुपयांची कामे होणार असून, २४ मार्च रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे, साहिल पाटील जलसंधारण विभागाचे बासोळे, आणि कारंजा तालुका भाजप अध्यक्ष डॉ.राजु काळे, राजु भेंडे, अनिल कानकिरड, श्रीकृष्ण मुंदे, अशोक ठाकरे, राजु खोंड, रुपेश शहाकार, संजय भेंडे आदि उपस्थित होते. गावकºयांच्यावतीने आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच कामाच्या नामफलकाचे अनावरणक करण्यात आले. गिर्डा येथे ढाळीचे बांध, वनतळे, एलबीएस इत्यादी कामाचे भूमिपुजन झाले. वाघोळा येथे नाला खोलीकरण, ढाळीचे बांध या कामाचे भूमिपुजन झाले. धामणी येथे नाला खोलीकरण, सिंचन तलाव दुरुस्ती, बंधारा दुुरुस्ती, ढाळीचे बांध या कामाचे भूमिपुजन झाले. वडगाव येथे नाला खोलीकरण, बंधारा दुरुस्ती आणि ढाळीचे बांध या कामाचे भूमिपुज झाले. यावेळी किशोर बालचंद जाधव सरपंच, जि.प.सदस्य मोहन महाराज, पुंडलीक महाराज माजी सरपंच, रायसिंग राठोड, शिवराम राठोड, सुभाष पाटील खानबरड, आत्माराम नाईक, रमेश राठोड,संजय जाधव, चंदु जाधव, बालचंदभाऊ जाधव, सुभाष पवार, गंगाराम राठोड, प्रकाश पठाळे, बाळु भगत, बंडु चव्हाण, रतन चव्हाण, वासुदेव चव्हाण, दशरथ टेलर, प्रकाश चव्हाण, उकंडा राठोड, इत्यादींसह गावकरी मंंडळी उपस्थिती होती. किन्ही रोकडे येथे नाला खोलीकरण, ढाळीचे बांध या कामाचे भूमिपुजन झाले. कामठा येथे नाला खोलीकरण, बंधारा दुुरुस्ती, ढाळीचे बांध या कामाचे भूमिपुजन करण्यात आले.