.............
साहित्य विक्रीने वाहतूक विस्कळीत
वाशिम : शहरातून गेलेल्या महामार्गाच्या कडेला बसून कपडे विक्री, खेळणी, कागदी व प्लास्टिकची फुले विक्रीचा व्यवसाय केला जात आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून शहर वाहतूक विभागाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी धनंजय गोटे यांनी गुरुवारी निवेदनाद्वारे केली.
............
अनसिंगातील अरुंद रस्त्यांमुळे गैरसोय
वाशिम : तालुक्यातील अनसिंग येथे अरुंद रस्त्यांमुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कुणाच्या घरासमोर वाहन उभे केल्यानंतर वाद होऊन त्याचे रूपांतर भांडणात होत असल्याने गावातील किमान मुख्य रस्त्याचे तरी रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
.................
रस्त्यात कचरा; दुर्गंधीमुळे गैरसोय
वाशिम : शहरात काही ठिकाणी हाॅटेल व्यावसायिक कचरा, शिल्लक राहिलेले अन्न रस्त्याच्या कडेला टाकून देत असल्याने दुर्गंधी सुटत आहे. येथे वराहांचा मुक्त संचार राहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधितांनी याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.