लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने जिल्हाभरातील गावांमध्ये जलसंधारणाची विविध स्वरूपातील कामे होण्याकरिता ‘सुजलाम्-सुफलाम’ अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम होत असून याअंतर्गत मोठ्या आकारमानाच्या शेतततळ्यांच्या कामांनाही बुधवारपासून सुरूवात करण्यात आलेली आहे. या उपक्रमाविषयी गावोगावच्या शेतकºयांमधून समाधान व्यक्त होत आहे.‘सुजलाम्-सुफलाम’ अभियानांतर्गत सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये प्रशासकीय यंत्रणेतील बहुतांश कर्मचारी गुंतले आहेत. विशेषत: कृषी विभागाने या कामांमध्ये स्वत:ला झोकून दिले असून मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथे बुधवारपासून सुरू झालेल्या शेततळ्यांच्या कामांमध्येही कृषी विभागातील कर्मचाºयांचा सहभाग प्रामुख्याने दिसून आला.
‘सुजलाम्-सुफलाम’ योजनेंतर्गत शेतततळ्यांच्या कामास सुरूवात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:35 PM