सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जनावरांवर विविध प्रकारचे रोग येतात, अशा परिस्थितीत पशुपालक मोठ्या चिंतेत दिसत आहेत. त्यामुळे संबंधितांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे संपाकडे लक्ष देण्याची मागणी पशुपालक करीत आहेत.
पावसाळ्यात पाळीव जनावरांना विविध रोगांची लागण होऊ नये म्हणून लस देण्यात येते; परंतु गेल्या ३५ दिवसांपासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने सर्व जनावरे लसीपासून वंचित आहेत. सध्या हगवण, सर्दी, पायखुरी, तोंडखुरी, अशा रोगांनी जनावरांवर आक्रमण केले आहे. त्यात खाजगी पशुवैद्यकीय अधिकारीसुद्धा जनावरांना तपासणीकरिता नकार देत आहेत. त्यामुळे संबंधितांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाकडे गंभीरतेने घेण्याची मागणी पशुपालकांकडून करण्यात येत आहे, तसेच मजूर वर्गाकडे बऱ्याच प्रमाणावर शेळ्या, कोंबड्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना पावसाळ्यात दवाखान्याची अत्यंत गरज असते. त्यामुळे तेही अडचणीत सापडले आहेत.