शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:28 AM

वाशिम : राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ...

वाशिम : राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय काम वाटप समितीमार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना कंत्राटी तत्त्वावर काम वाटप करण्यात येणार असून, ६ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्रांकडे विविध कंत्राटी प्रकारची पदे भरण्यासाठी मागणी प्राप्त झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्रांकडे नोंदणीकृत जिल्ह्यातील इच्छुक व पात्र सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायट्यांनी ६ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र, वाशिम येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे. बेरोजगारांनी स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी ही सहकार कायदा १९६० अन्वये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच ही संस्था कार्यरत असल्याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहायक उपनिबंधक यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. संस्थेतील सदस्य क्रियाशील असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. संस्थेच्या सदस्यांचे सेवायोजना कार्ड चालू स्थितीत असणे आवश्यक आहे, असे बजाज यांनी स्पष्ट केले.

०००००००००

लेखापरीक्षण अहवाल आवश्यक

प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्थेने तिचा आर्थिक वर्ष २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक आहे. सुशिक्षित बेरोजगार संस्थेची नोंदणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे.