लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : येथील कामगार कल्याण मंडळाने ४ आॅगस्टपर्यंत तालुक्यातील कामगारांचे अर्ज भरुन घेतले, पंरतु ६ आॅगस्ट रोजी भरुन घेतलेले अर्ज पंचायत समितीच्या वºहंडयात अस्थाव्यस्त अवस्थेत पडलेले आढळल्याने एकच गोंधळ उडाला. ही बाब येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या लक्षात आणुन दिल्यावर तहसीलदारांनी तहसील कर्मचाऱ्यांमार्फत अर्ज उचलुन जमा करण्यास सांगितले. या गंभीर प्रकाराबद्दल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांना घेवुन तहसीलवर मोर्चा काढून दोषी कामगार कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली .मंगरुळपीर येथील पंचायत समितीमध्ये कामगार नोंदणीनुसार ४ आॅगस्ट रोजी पर्यंतचे सर्व अर्ज संबधीत कर्मचाऱ्यांनी स्विकारले. परंतु ६ आॅगस्ट रोजी सकाळी पं.स.सभागृह, परिसरात नालीमध्ये अर्ज पडलेले दिसले. ही बाब कामगारांसोबत कामगार मंडळाच्या कर्मचाऱ्यांची मस्करी करण्यासारखी असल्याचा आरोप कामगारांसह शिवसैनिकांनी केला. संबंधीत सर्व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार व ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनाव्दारे शिवसेनेन केली आहे. या निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख विवेक नाकाडे, शिवसेनेचे जि.प.सदस्य हरिदास गोदमले, शिवसेनेचे रवि म्हातारमारे, संजय कातडे, जुबेर मोहनावाले, सुनिल कुर्वे यांच्या स्वाक्षºया आहेत.
शिवसेनच्या पदाधिकाऱ्यांसह कामगारांचा मंगरुळपीर तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 4:43 PM