लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव(वाशिम): तालुक्यातील शाखा डाकपालांची १५ पदे रिक्त आहेत. त्यापैकी काहीठिकाणी रोजंदारी तत्वावरील कर्मचाºयांकडे पदभार सोपविण्यात आला आहे; तर काहीठिकाणी अद्याप कुणीच कार्यरत नाही. रिक्त पदांमुळे कामे प्रभावित होत आहेत. मालेगाव तालुक्यात दोन उपडाकघर मालेगाव व शिरपूर येथे कार्यान्वित आहेत. त्यापैकी मालेगाव उपडाकघराच्या अखत्यारीत १९ शाखा डाकघर आहेत; तर शिरपूर उपडाकघराच्या अखत्यारीत १५ शाखा डाकघर येतात. यापैकी मारसुळ, नंधाना, कळंबेश्वर, मुंगळा, डव्हा, मेडशी, केनवड, मांगुळ झनक, चिचांबापेन, करंजी आदी शाखा डाकघरात डाकपालांची पदे रिक्त आहेत. काहीठिकाणी रोजंदारीवर कर्मचारी कार्य करीत आहेत. काहीठिकाणी तर रोजंदारी कर्मचारी म्हणून कार्यरत कर्मचाºयांच्या नातेवाईकांनाच प्राधान्य देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
मालेगाव तालुक्यातील डाकपालांची कामे सोपविली रोजंदारी कर्मचा-यांकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 7:08 PM
मालेगाव(वाशिम): तालुक्यातील शाखा डाकपालांची १५ पदे रिक्त आहेत. त्यापैकी काहीठिकाणी रोजंदारी तत्वावरील कर्मचाºयांकडे पदभार सोपविण्यात आला आहे; तर काहीठिकाणी अद्याप कुणीच कार्यरत नाही. रिक्त पदांमुळे कामे प्रभावित होत आहेत.
ठळक मुद्देमालेगाव येथील प्रकारशाखा डाकपालांची १५ पदे रिक्त रिक्त पदांमुळे कामे प्रभावित