लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत ख-या बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या ठिकाणावरच करण्याची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार, डिसेंबर २०१७ पर्यंत खरे बांधकाम कामगार नोंदणीपासून व लाभापासून वंचित राहणार नाहीत. यासाठी कामाच्या ठिकाणीच नोंदणी शिबीरांचे आयोजन केले जात असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी पी.आर. महाले यांनी दिली. १५ आॅक्टोबर रोजी नोंदणी आस्थापना मालक साबेरखान पठण यांच्या कामाच्या ठिकाणी आयोजित नोंदणी शिबीरात ते बोलत होते. या शिबीराचे आयोजन असंघटीत बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास माजी जि.प. सदस्य दिलीप देशमुख, संघटनेचे राज्य सरचिटणीस संजय मंडवधरे, जिल्हाध्यक्ष शे. सईद यांची उपस्थिती होती. शिबीरात नवीन नोंदणी, नुतनीकरण, शिष्यवृत्ती व विविध लाभांचे अर्ज स्विकारणे ही कामे करण्यात आली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात सामाजीक सुरक्षा म्हणून कामगार अपघाती मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये अनुदान, नैसर्गिक मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, अपंगत्व आल्यास २ लाख रुपये, मयत कामगाराच्या वारसास वर्षाला २४ हजार रुपये, पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणासाठी २५०० रुपये, आठवी ते दहावीपर्यंत ५ हजार रुपये, १० वी, १२ वी उत्तीर्ण व ५० टक्के गुण मिळाल्यास १० हजार रुपये, पदवी शिक्षणासाठी २० हजार रुपये, पदव्युत्तर शिक्षणासाठी २५ हजार रुपये, अभियांत्रिकी ६० हजार व वैद्यकिय शिक्षणासाठी एक लाख रुपये प्रतिवर्ष शिष्यवृत्ती, गंभीर आजारासाठी २ लाखापर्यत खर्चाचा परतावा, असे प्रमुख लाभ मंडळातील नोंदणीकृत कामगारांना देण्यात येतात, अशी माहिती महाले यांनी यावेळी दिली.
कामाच्या ठिकाणीच होणार बांधकाम कामगारांची नोंदणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 7:45 PM
वाशिम: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत ख-या बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या ठिकाणावरच करण्याची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे.
ठळक मुद्देपी. आर. महालेनोंदणी शिबिरात कामगारांच्या समस्यांचे निराकरण