वाशिम, दि. १६- महाराष्ट्र कुस्तीगीर व क्रीडा मंडळाच्या वतीने श्री बालासाहेब यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेला शनिवार, १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेचे यंदा ५0 वे वर्ष असून राज्यभरातील मल्ल याठिकाणी दाखल झाले आहेत. १६ ऑक्टोबरला या स्पर्धेचा समारोप झाला. स्व. गोविंदराव भालेराव यांच्या स्मरणार्थ दरवर्षी येथे बालासाहेब यात्रोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेची परंपरा जोपासली जाते. महाराष्ट्र कुस्तीगीर व क्रीडा मंडळाच्या पुढाकारातून होणार्या या उपक्रमातून समाजाला बलवान, शीलवान, चरित्र्यवान बनविण्याचा उदात्त हेतू बाळगला जातो. कुठलेही शुल्क न आकारता मल्लांना प्रवेश असणार्या या स्पर्धेचे यंदा ५0 वे वर्ष आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर मंडळाच्या हौदातून आतापर्यंत महाराष्ट्र केशरी, हिंद केशरी, विदर्भ केसरी असे अनेक मल्ल खेळून गेले आहेत. १५ ऑक्टोबरला पार पडलेल्या स्पर्धेकरिता प्रथम बक्षीस ७ हजार रुपये स्व. बबनराव इंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवाजी इंगळे यांच्यातर्फे देण्यात आले; तर द्वितीय ६ हजार रुपये रोख बालू मुरकुटे यांच्यातर्फे, तृतीय ५ हजार रुपये स्व. छोटेलाल ठाकूर यांच्या स्मरणार्थ संग्राम ठाकूर यांच्यातर्फे, चतुर्थ ३ हजार रुपये धनंजय गोटेतर्फे, पाचवे २ हजार रुपये स्व. दशरथ तुपसांडे स्मरणार्थ गजानन तुपसांडेतर्फे देण्यात आले. १६ ऑक्टोबर रोजी खेळविल्या गेलेल्या कुस्त्यांचे प्रथम बक्षीस ५0 हजार रुपये व १ किलो चांदीची गदा गिरीश लाहोटी व तरणसिंग सेठी तिरुपती ग्रुपतर्फे देण्यात आले. द्वितीय बक्षीस ३१ हजार रुपये स्व. सहदेव मलिक यांच्या स्मरणार्थ नितेश मलिक यांच्यातर्फे, तृतीय बक्षीस २१ हजार रुपये रोख राजू पाटील राजे यांच्यातर्फे, चौथे बक्षीस ११ हजार रुपये रोख स्व. तुकाराम जाधव यांच्या स्मरणार्थ नारायणराव जाधव यांच्यातर्फे देण्यात आले, अशी माहिती आयोजकांनी दिली
वाशिमच्या मैदानावर रंगली कुस्ती स्पर्धा!
By admin | Published: October 17, 2016 2:08 AM