वाशिम : ‘सोमवारपासून पुन्हा कडक निर्बंध’ असा संदेश सोशल मीडियात व्हायरल झाल्याने व्यापाºयांसह नागरिकही संभ्रमात पडले आहेत. दरम्यान, हा संदेश पुर्णत: चुकीचा व फेक असून, जिल्ह्यात तुर्तास तरी कोणतीही नवीन नियमावली नव्याने लागू नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून, १५ आॅगस्टपासून सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. दरम्यान केरळ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आणि राज्यातही ‘डेल्टा प्लस’ विषाणूचे रुग्ण आढळून येत असल्याने राज्यातील वाशिमसह ३१ जिल्ह्यांत सोमवारपासून तिसºया टप्प्यातील निर्बंध लागू होणार असल्याचा संदेश सोशल मीडियात शनिवारी सायंकाळपासून चांगलाच व्हायरल झाला आहे. रविवार, ३० आॅगस्ट रोजी दिवसभर सोशल मीडियात हाच संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने व्यापाºयांसह नागरिकही संभ्रमात पडले. यासंदर्भात जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्याशी संपर्क साधला असता, तिसºया स्तरातील निर्बंधाबाबत तुर्तास तरी वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना नाहीत. जिल्ह्यात सध्या आहे तीच नियमावली लागू आहे, असे स्पष्ट केले. जिल्ह्यात सध्या आहे तीच नियमावली लागू आहे. नवीन नियमावलीसंदर्भात तुर्तास तरी वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही सूचना प्राप्त नाहीत. चुकीच्या संदेशावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये तसेच जनतेची दिशाभूल करणारे चुकीचे संदेशही कुणी व्हायरल करू नये.- शण्मुगराजन एस.जिल्हाधिकारी, वाशिम
सोशल मीडियात ‘लॉकडाऊन’संदर्भात चुकीचा संदेश ‘व्हायरल’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 7:57 PM