वाशिम - दिवाळी या सणामध्ये अज्ञानाचा अंधकार दूर होवून ज्ञानाचा प्रकाश पसरावा यासाठी तेलाचे दिवे लावले जातात. पण या उत्साहाच्या भरात श्रीमंतीच्या प्रदर्शनापोटी हजारो रुपयांच्या फटाक्यांच्या धुर करणे, विज टंचाईच्या दिवसात दिव्याचा झगझगाट करणे यातच भुषण मानले जावू लागले आहे. फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणामाची माहिती देत पर्यावरणपूरक दिपावली उत्सव साजरा करण्याचे आवाहन व जनजागृती केल्या जात आहे.तसेच या चिमुकल्यांनी फटाके न फोडण्याची शपथ सुध्दा शाळेत घेतली.
फटाक्यामुळे होणारे दुष्परिाम यांची फारच थोड्या जणांना माहिती आहे. बालकामगारांपासून असुरक्षीत परिस्थिती दिवसभरात मेहनतीने फटाके तयार करुन घेतले जातात. आपण आपल्या मौजेसाठी विषारी वातावरणात काम करुन त्यांचे जीवन एक प्रकारे धोक्यात घालत आहेत. फटाके उडविल्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होते. फटाक्याच्या आवाजामुळे लहान मुलांच्या श्रवण शक्तीवर सुध्दा परिणाम होतो. तसेच त्यामुळे भावनीक ताण वाढून सर्वांना विशेषत वृध्द व आजारी व्यक्तींना जास्त त्रास होतो.
फटाक्यात मोठ्य प्रमाणात विषारी घटक असतात. त्यातील तांबे, कॅडीनियम, शिसे, मॅग्नेशियम, जस्त, सोडीयममुळे फटाके उडविल्यानंतर त्यामधून विषारी वायु उत्सर्जीत होवुन श्वसन संस्था, मज्जा, संस्थेवर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. रक्ताची प्राणवायु वाहुन नेण्याची क्षमता कमी होते व बारीक ताप, उलट्या वगैरे त्रास होतो, तसेच त्यामुळे मोठ प्रमाणावर हवेचे प्रदुषण होते . फटाके उडवितांना पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे जीवघेणे अपघात होवु शकतात.
वरील सर्व बाबी लक्षात घेवुन राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इकोक्लबने राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी व प्राचार्य मिना उबगडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक फटाका मार्केटमध्ये जावून फटाके न उडविण्याबाबत जनप्रबोधन केले . तसेच यंदाची दिवाळी मिठाई , आवडीचे पुस्तके , किल्ले, आरास, रांगोळ्या, आकाश कंदील, भेटवस्तु इत्यादी सहयाने साजरी करण्याचे लोकांना आवाहन केले. तसेच या कार्यक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण पुरक दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली व संकल्प पत्र सुध्दा भरुन घेण्यात आले .
सदर हरित सेनेचे विद्यार्थी श्वेता भोने, प्रगती वाघ, सानिका इंगळे, वैष्णवी चव्हाण, सई लहाने, वैष्णवी वानखडे, श्रध्दा देव, दिक्षा , गवई, सालेहान, सानिका तोष्णीवाल, राजनंदीनी बोरकर, शुभम वाकुडकर, शुभम चव्हाण, गौरीनंदन जोशी, आकाश खुशवाह, प्रतिक सावळे, अभिषेक भिसडे, यशोदिप वायाळ ,कुणाल कावरखे, यांचे सहकार्य मिळाले.कार्यक्रमाचे आयोजन व संचालन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी यांनी केले आहे.