काशीनंतर सर्वाधिक शिवमंदिरे वाशिम शहरात असल्याचे वत्सगुल्मनगरी या पुस्तकात उल्लेख आहे. येथे कावड मंडळेही माेठ्या प्रमाणात असल्याने शिवभक्ताची काशी म्हणून वाशिम शहराची ओळख आहे, परंतु काेराेनामुळे दरवर्षी श्रावण महिन्यात माेठ्या प्रमाणात कार्यक्रम शिवमंदिरावर हाेत असतात. गतवर्षी काेराेना संसर्गामुळे काेणतेच कार्यक्रम न झाल्याने, या वर्षीही प्रशासनाकडून काेणत्याच प्रकारच्या सूचना नसल्याने भाविकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. यंदा २९ दिवसांचा श्रावण असून, ९ सप्टेंबरपासून श्रावण मासास प्रारंभ हेाऊन ६ सप्टेंबरपर्यंत आहे. यामध्ये ५ श्रावण साेमवार येणार आहेत.
.....
९ ऑगस्टपासून श्रावण
श्रावण मासात शिवभक्त, कावड मंडळातील सदस्य ज्याेतिर्लिंगाच्या ठिकाणी दर्शनास जातात. या वर्षी ९ ऑगस्टपासून श्रावण मास लागत असून, ६ सप्टेंबरपर्यंत आहे, परंतु काेराेना संसर्गामुळे मंदिरे बंद असल्याने या वर्षीही घरूनच दर्शन घ्यावे लागेल.
.....
व्यावसायिक म्हणतात.....
दरवर्षी श्रावण महिन्यात संपूर्ण परिवार महादेवाला वाहणारे ‘बेल’ ताेडण्यासाठी जाऊन त्याचे पाकीट बनवून विकण्याचा व्यवसाय करीत आलाे आहे. गतवर्षी काेराेनामुळे काही माेजक्या लाेकांनीच संपर्क साधून बेल मागितले. शहरात घराेघरी जाऊन बेल विकता न आल्याने माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वर्षी मंदिर उघडणार असल्यास व्यवसाय हाेण्याची शक्यता आहे. नाहीतर याही वर्षी व्यवसायावर परिणाम हाेणार आहे.
- ओम मुठाळ
बेल व्यावसायिक, वाशिम
दरवर्षी श्रावण महिन्याच्या साेमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये सेज (शिवलिंगास सजविणे) भाविक माेठ्या उत्साहात साजरी करतात. याकरिता महादेवाच्या पिंडाला बेल, फुलांनी सजवितात. याकरिता अनेक भाविक २० ते २५ किलाे फुलांसह बेलांचे पाकीट विकत घेतात. याकरिता आधीच बुकिंग घेतल्या जाते, परंतु या वर्षी श्रावण साेमवारी हे कार्यक्रम हाेणार नसल्यास नुकसानच आहे.
- रामा इंगळे, फुल व्यावसायिक, वाशिम