लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : स्वामी रामदेवबाबांच्या प्रेरणेने व पतंजली युवा भारत मानोराच्यावतीने योगमय प्रखंड अभियान, कुपटा अंतर्गत, ०५ ते ९ नोव्हेंबर पर्यंत कुपटा, वापटा, पारवा, आसोला, हिवरा, आमगव्हाण, कोंडोली, एकलारा, हट्टी, गुंडी, वाटोद, धामणी ,चोंढी, देवठाणा,या १४ गावात एकाच वेळी भव्य निशुल्क योगशिबिर मोठ्या उत्स्फुर्त प्रतिसादासह संपन्न झाले.या शिबिराला विशेष पाहुणे सचिन केंद्रीय प्रभारी युवा भारत व अखिल खान, यांनी योगशिबिर घेवुन उपस्तिी दर्शविली. शिवाय शंकर नागापुरे, गजानन धर्माळे, शंकर ठाकरे, देविदास पाटील, भगवंतराव वानखडे, कैलास भटकर ही जिल्हा पदाधिकारी उपस्थित होती. या शिबिरामध्ये योग प्राणायामाव्दारे आजार कसे बरे करावे, यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले तसेच पतंजलीच्या रोजगारासंबंधी माहिती, आयुर्वेदीय वनस्पती संबंधी ज्ञान, स्वदेशीचे महत्व, वृक्षारोपण, नित्यायोगवर्गाचे महत्व इ.बद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय भारतात प्रथमच पूर्ण प्रखंडात १४ गावात झालेल्या या शिबिराचे वैशिष्टय एक की १० वर्षाच्या योगशिक्षक राम कैलास भटकर याने योगशिबिर घेतले.शिबिराच्या समाप्तीनंतर कुपटा व कोंडोली येथे सहयोगशिबिर लावण्यात आले आहे. योगमय प्रखंड अभियानाच्या यशस्वीतेसाठी शंकर नागपूरे, कैलास भटकर, डॉ.प्रशांत जाधव, जीवन भोयर, अरुण पाटील, गणेश परांडे, डॉ.सुहास देशमुख, योगेश राऊत, डॉ.भुषण गावंडे, राम भटकर, ज्ञानेश्वर पाटील, अशोक मोहाळे , नितीन काळे, गोपाल खोडके, विष्णुपंत खोडके, निलेश तायडे, निलेश चतुरकार, गोपाल तायडे, इत्यादी अथक प्रयत्न केलेत.
मानोऱ्यासह १४ गावात एकाच वेळी योगशिबिर संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 9:02 PM
योगऋषी स्वामी रामदेवबाबांच्या प्रेरणेने व पतंजली युवा भारत मानोराच्यावतीने योगमय प्रखंड अभियान, कुपटा अंतर्गत, ०५ ते ९ नोव्हेंबर पर्यंत कुपटा, वापटा, पारवा, आसोला, हिवरा, आमगव्हाण, कोंडोली, एकलारा, हट्टी, गुंडी, वाटोद, धामणी ,चोंढी, देवठाणा,या १४ गावात एकाच वेळी भव्य निशुल्क योगशिबिर मोठ्या उत्स्फुर्त प्रतिसादासह संपन्न झाले.
ठळक मुद्देपतंजली युवा भारत मानोराच्यावतीने योगमय प्रखंड अभियानयोगशिबिराला लाभला उत्स्फुर्त प्रतिसाद