मालेगाव : विदर्भातील जिल्ह्यांमध्ये असलेल्या गड-किल्ल्यांची माहिती सर्वांना व्हावी, अस्तित्व हरविलेल्या या किल्ल्यांना किमान वैभव प्राप्त व्हावे, या उद्देशाने ‘शौर्यशंभुचा शिलेदार’ या सेवाभावी संस्थेशी जुळलेल्या युवकांनी गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोहिम हाती घेतली आहे. त्यानुषंगाने १७ व १८ मार्च रोजी गाविलगड किल्ल्याला भेट देवून त्याचा जागर सुरू करण्यात आला आहे.विदर्भातील गड-किल्ल्यांच्या इतिहासाला उजाळा मिळावा, अडगळीत सापडलेल्या या किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, या मूळ उद्देशाने प्रेरित होऊन ‘शौर्यशंभुचा शिलेदार’ या सेवाभावी संस्थेच्या युवकांनी मोहिम हाती घेतली. याबाबत संस्थेचे प्रा. रवि बविस्कार यांनी सांगितले, की गाविलगड हा विदर्भातील महत्वाचा किल्ला असून मोठ्या प्रमाणात किल्ल्याची इमारत आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. इंग्रज-मराठा युद्धाचा दैदिप्यमान इतिहास लाभलेला हा दुर्ग हल्ली मात्र हलाखीचे जीणे जगत आहे. शार्दुल दरवाजा, नक्षीदार दिल्ली दरवाजा, गडावरील ९ तलाव, महादेव मंदिर, छोटी मशीद, १९.५ फुट लांबीची लाहोरी तोफ, २५ फूट लांबीची पीरफत्ते तोफ यासह इतर तीन अजस्त्र तोफा, राणीचा झरोका आणि भव्य असा दरबार पाहिल्यानंतर या किल्ल्याचे वैभव लक्षात येते. दरम्यान, गाविलगडचे महत्व व त्याचा इतिहास लोकांसमोर मांडण्याकरिता प्रा. प्रकाश कापुरे, प्रा. रवी बाविस्कर, नितीन काळे, अनिल सोळंके, सुहास लावरे, विजय भुरकाडे, निखिल गोरे, विनोद नाईकवाड, राऊत, इंगोले, तेजस आरू, मोहन मुंजाळ, संदीप मुसळे, परमेश्वर सरनाईक, सागर भांगडिया आदिंनी पुढाकार घेतला आहे.
विदर्भातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरसावली युवा मंडळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 4:31 PM
मालेगाव : विदर्भातील जिल्ह्यांमध्ये असलेल्या गड-किल्ल्यांची माहिती सर्वांना व्हावी, अस्तित्व हरविलेल्या या किल्ल्यांना किमान वैभव प्राप्त व्हावे, या उद्देशाने ‘शौर्यशंभुचा शिलेदार’ या सेवाभावी संस्थेशी जुळलेल्या युवकांनी गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोहिम हाती घेतली आहे.
ठळक मुद्देकिल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, या मूळ उद्देशाने प्रेरित होऊन ‘शौर्यशंभुचा शिलेदार’ या सेवाभावी संस्थेच्या युवकांनी मोहिम हाती घेतली. त्यानुषंगाने १७ व १८ मार्च रोजी गाविलगड किल्ल्याला भेट देवून त्याचा जागर सुरू करण्यात आला आहे.गाविलगड हा विदर्भातील महत्वाचा किल्ला असून मोठ्या प्रमाणात किल्ल्याची इमारत आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.