लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात ४ जानेवारीला गृहविभागाने काढलेला जीआर रद्द करण्यात आल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याने पाेलीस भरतीची तयारी करण्यात येत असलेल्या तरुणांचा पूर्ण हिरमाेड झाला आहे. अनेक वर्षांपासून करीत असलेली मेहनत व्यर्थ ठरते की काय अशी भीती तरुणांमध्ये असल्याचे ‘लाेकमत’ने ९ जानेवारी राेजी त्यांच्याशी संपर्क साधला असता दिसून आले. जिल्ह्यात २०१६, २०१७-१८ मध्ये पाेलीस भरती घेण्यात आली हाेती. त्यांनतर जिल्ह्यात पाेलीस भरतीच घेण्यात आली नाही. यामध्ये जिल्ह्यातील अनेक तरुण सहभागी झाले हाेते. तेव्हा काही कारणास्तव रद्द ठरलेले तरुण रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यात भरतीचा जीआर निघाल्याने त्यांच्यामध्ये आनंद दिसून येत हाेता; परंतु ४ जानेवारीला ताे जीआर रद्द करण्यात आल्याने पोलीस भरतीच्या तयारीला लागलेल्या तरुणांच्या पदरी अवघ्या काही दिवसातच निराशा आलीय.
जिल्ह्यात ६८० लोकांमागे एक पोलीसजिल्ह्यात पोलिसांची संख्या केवळ १,५०० आहे. जिल्ह्याची २०११ नुसार लाेकसंख्या १० लाख २६ हजार पाहता ६८० लाेकांमागे एक पाेलीस कर्मचारी दिसून येताे. यामुळे पाेलिसांवर किती माेठा ताण आहे हे दिसून येते. नागरिकांचे संरक्षणासह जिल्ह्यातील अनेक प्रकाराला आळा घालताना पाेलिसांची दमछाक हाेत आहे.
काय म्हणतात तरुण!२०१७-१८ पासून पाेलीस भरती झाली नाही. काही दिवसांपूर्वी पाेलीस भरतीबाबत जीआर काढण्यात आला हाेता; परंतु ताेही रद्द करण्यात आल्याने पाेलीस हाेण्याची आशा धूसर झाली आहे. तब्बल तीन वर्षांपासून पाेलीस भरतीसाठी मेहनत घेत आहे. गत भरतीमध्ये केवळ तीन गुण कमी पडल्या ने भरती हाेऊ शकलाे नाही. यावर विचार हाेणे गरजेचे आहे.- रवी माेहळे, जांभरुण परांडे
मी गत तीन वर्षांपासून पाेलीस भरतीसाठी मेहनत घेत आहे. त्यात वय वाढत आहे. लवकच भरती प्रक्रिया न झाल्यास पाेलीस हाेण्याचे स्वप्न स्वप्नच राहील. गत भरतीमध्ये ग्राउंडमध्ये कमी पडलाे हाेताे. यावेळी मेहनत घेतली; परंतु पाेलीस भरती हाेईल की नाही, ही चिंता आहे. - संताेष कैलास गायकवाडजांभरुण परांडे
पाेलीस भरतीसाठी काढण्यात आलेला जीआर रद्द झाल्याने पाेलीस हाेण्याच्या आशा मावळल्या. अनेक वर्षांपासून मोठी भरती झाली नाही. ५ ते ६ हजार भरती हाेते. त्यातही नव्यानेच रद्द केलेल्या जीआरमुळे उमेदवार नाराज झाले आहेत. माझे कुटुंब शेतीवर अवलंबून असून घरच्यांची पाेलीस व्हायची इच्छा आहे; परंतु वय वाढत असल्याने पाेलीस भरती लवकर झाली तरच खरे. - ओंकार वानखडे , वाळकी मांजरी