लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम: निसर्ग प्रेमाने झपाटलेल्या स्थानिक निसर्ग व्यासांगी सावली प्रतिष्ठान या नैसर्गिक संस्थेच्या वतीने वाशीम तालुक्यातील शेलगाव येथील सावळापुर शेतशीवारात विवीध काटेरी फळवर्गीय वृक्षांची लागवड करन्यात आली.कोकण, सह्याद्री आणि पश्चिम घाट माथ्यावर डोंगरची मैना म्हणून प्रसिद्ध असलेल्या करवंद हा रानमेव्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. विदर्भात हा रानमेवा दूर्मीळ आढळतो. त्या अनुषंगाने सावली प्रतिष्ठानची टीम उन्हाळ्यात मुंबईला जात असताना निसर्गरम्य ईगतपुरी रेल्वे स्थानकावर डोंगरची मैना (करवंद) पळसाच्या पानामध्ये टाकून विक्री केल्या जात होते त्यातील काही पाकीट खरेदी करून त्याच्या बीया संग्रहीत करन्यात येउन पावसाळ्यात शेतक?्यांच्या बांधावर करवंद,काराटी या फळझाडांबरोबरच सागरगोटी या कमी कालावधीत उंच आणि क्षीतीज समांतर दीशेने वाढणा?्या जाळी सदृश वृक्षांचे रोपण प्रायोगिक पद्दतीवर प्रतिष्ठानच्या वतीने केल्या जात आहे