वाशिम : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारांची संख्या वाढत असून ही बाब युवकांसाठी चिंताजनक मानली आहे. बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत युवक काँग्रेसने बेरोजगार नोंदणी अभियान हाती घेतले आहे. या अभियानात जिल्ह्यातील युवकांनी सहभागी होवून ८१५१९९४४११ या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन युवक काँग्रेसचेवाशिम जिल्हाध्यक्ष बाबुराव शिंदे पाटील यांनी केले.देशातील बेरोजगारीचा प्रश्न व ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरुन लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारने सीएए, एनआरसी कायदा आणला़ परंतू देशाला एनआरसीची नव्हे तर राष्ट्रीय बेरोजगारी रजिष्ट्रेशन (एनआरयु )ची गरज असल्याची मागणी जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष शिंदे यांनी केली़. स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळानंतर मागील पाच ते सहा वर्षांमध्ये देशात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक वाढल्याची बाब राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालावरुन पुढे आली आहे, असे बाबुराव शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.नोटबंदीच्या निर्णयानंतर ही परिस्थिती ओढावली असून या निर्णयामुळे लहानमोठे उद्योग डबघाईस आल्याने लाखो तरुणांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली. ़शिवाय असंघटीत क्षेत्रातील अनेक रोजगार नष्ट झाले आहेत़ केंद्र सरकार खासगीकरणाला बळ देत असून सरकारी नोकºयांमध्ये कपातीचे धोरण राबवित आहे. कॉपोर्रेट क्षेत्रातही मंदीचे सावट असल्याने सद्यस्थितीत शेतकºयांपाठोपाठ आता बेरोजगारांच्या आत्महत्येचे सत्र सुरु झाल्यास नवल वाटायला नको, अशी टिकाही शिंदे यांनी केली. या गंभीर प्रश्नाकडे शासनकर्त्यांचे लक्ष वेधून देशातील बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी युवक काँग्रेसने एक अभियान हाती घेतले आहे. युवक काँग्रेसच्या तसेच अन्य बेरोजगार तरुण, तरुणींनी टोल फ्रि क्रमांकावर मिस कॉल देवून नोंदणी करण्याचे आवाहन बाबुराव शिंदे यांनी केले.
बेरोजगारीच्या प्रश्नावरून युवक काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 6:10 PM