रिसाेड तालुक्यातील झालेल्या ३२ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायतीत युवकांना प्राधान्य मतदारांनी दिल्याचे दिसून आले. आमदार अमित झनक यांच्या गावामध्ये अमित झनक यांना सर्व ९ पैकी ९ जागेवर विजय मिळविला. तसेच राजकारण्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले कवठा ग्रामपंचायतमध्ये स्वप्निल सरनाईक या युवा नेत्याच्या नेतृत्वात ११ पैकी ७ जागेवर विजय खेचून आणला. तर रिठद येथे परिवर्तन ग्रामविकास पॅनलने १३ पैकी १३ जागेवर विजय प्राप्त केला. सवडमध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गजानन लाटे यांनी सवड ग्रामपंचायतमध्ये ११ पैकी ७ जागा प्राप्त केल्या. हराळ येथे खाडे यांच्या गटाने १३ पैकी १० जागांवर विजय खेचून आणला. गाेभणी येथे जनविकास आघाडीने ११ पैकी ७ जागा मिळविल्यात. केशवनगर येथे ग्रामविकास आघाडीने ७ पैकी ७ जागेवर विजय प्राप्त केला. गाेवर्धन येथे ११ पैकी ७ जागा ग्रामविकास पॅनल,चिखली येथे स्वप्निल सरनाईक यांच्या गटाने ९ पैकी ६, चिंचाबापेन येथे बबनराव सानप व सचिन इप्पर यांच्या एकता ग्राम विकास पॅनलने ११ पैकी ६ जागेवर विजय प्राप्त केला. वाकद येथील ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये जिल्हा परिषद सदस्य सुजाता देशमुख यांनी १३ पैकी ७ जागेवर विजय प्राप्त केला. तर वंचितचे अकीलभाई यांच्या गटाने ३ व एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. करंजी येथे महाविकास आघाडीने ७ पैकी ४ जागेवर विजय खेचून आणला. एकलासपूर येथे पंचायत समिती सदस्य कुल्हाळ यांनी ९ पैकी ६ तर खडकी सदार येथे डी.के.सदार यांनी ७ पैकी ५ जागेवर विजय प्राप्त केला. तालुक्यात सर्वाधिक विजय प्राप्त केलेल्या ग्रामपंचायती या अनंतराव देशमुख यांच्या आहेत.
...............
अनेक ग्रामपंचायतीत सर्वच सदस्य विजयी
मांगुळ झनक येथे आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात झालेल्ल्या निवडणुकीत ९ पैकी ९ , रिठद येथे परिवर्तन ग्रामविकास पॅनलने १३ पैकी १३, केशवनगर येथे ७ पैकी ७ जागांवर तसेच बिबखेडा येथे विठ्ठल नरवाडे व पळसखेडा येथे पंचायत समिती उपसभापती सुभाषराव खरात यांच्यासह इतर काही ग्रा.पं. चा समावेश आहे.
युवा नेते स्वप्निल सरनाईक यांनी आपल्या पॅनलचे सर्वाधिक उमेदवार विजयी करण्यात यश मिळविले.