नदीला पूर आल्यानंतर त्याचे पाणी पुलावरून जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ना आपला जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत होती. मुठ्ठा येथील युवक निलेश दामोदर चांडे याने स्वखर्चाने पुलावर पडलेले खड्डे बुजवून पुलामध्ये अडकलेला कचरा व बुरसन स्वखर्चाने जेसीबी लावून काढले. त्यामुळे लोकांचा त्रास थोड्या प्रमाणात कमी झाला आहे. निलेश चांडे यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे .
निवेदनाला केराची टाेपली
काही दिवसा अगोदर निलेश चांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे. अमानी ते रिठद रस्त्यावर १५ ते २० गावांची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यांची रुंदी वाढविणे रस्त्यावरील खड्डे बुजविणे व रस्त्यावर असलेल्या पुलांच्या उंची वाढविण्याच्या संबंधी निवेदन दिले होते. परंतु याचा फायदा झाला नाही.
..................