१२ जानेवारी रोजी सप्ताहाचे उद्घाटन होणार असून, स्वामी विवेकानंद यांचे कार्य, तत्त्वज्ञान व विचार याबाबत युवांचे प्रबोधन, युवाबाबत उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, युवक, युवतींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच १५ ते २० वर्षे मुले-मुली आणि २० वर्षांवरील ते २९ वर्षांखालील युवक व युवती अशा दोन गटात विज्ञान-तंत्रज्ञान, प्रगती, समाजसेवा उपाय, युवापुढील आव्हाने, नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्याकरिता युवांची भूमिका, स्वच्छता अभियान आदी विषयांवर जिल्हास्तरावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यात १४ जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये लोकशाही बळकटीमध्ये माझी भूमिका, इतिहास माझा मार्गदर्शक, ई-गव्हर्नन्स उपयुक्तता, शेती देशाचा आर्थिक कणा, साहित्य समाजाचे दिशादर्शक, स्वच्छता हे मिशन नसून अंगीकारावयाची वृत्ती, स्त्रीशक्ती ही आदिशक्ती आदी विषयांचा समावेश असेल. १५ जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच १६ जानेवारी रोजी स्थानिक स्तरावर युवक पुरस्कार्थी युवांना मार्गदर्शन करतील. कोव्हिड-१९ नियमांचे पालन करून या उपक्रमाचे आयोजन केले जाईल.
जिल्ह्यात १२ जानेवारीपासून युवा सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:34 AM