वाशिम : जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी आज, ५ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. विविध संवर्गातील २४२ पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना शासकीय सेवेत रुजू होण्याची मोठी संधी असणार आहे.
वाशिम जिल्हा परिषदमध्ये विविध विभागातील क संवर्गातील एकाचवेळी सरळसेवेने रिक्त पदे भरली जाणार असून त्याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा परिषदच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी एक हजार, मागास प्रवर्गातील आणि अनाथ उमेदवारासांठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ असणार आहे. ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी २५ ऑगस्ट च्या रात्री २३.५९ वाजेपर्यंत मुदत असणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणीकृत परीक्षा होणार आहे. अशावेळी एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास पंचाईत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करताना कोणत्या ठिकाणी अर्ज करावा, याबाबत योग्य विचार करणे आवश्यक आहे.
अशी आहे ऑनलाइन वेळापत्रकअर्ज नोंदणी सुरु- ५ ऑगस्टअर्ज सादर करण्याची अंतिम मुदत- २५ ऑगस्टपरीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत- २५ ऑगस्टपरीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र कधी मिळणार- परीक्षेच्या ७ दिवस आधी
संवर्गनिहाय सरळसेवेची २४२ रिक्त पदेजिल्हा परिषद वाशिम अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे. विविध विभागाशी निगडित २४२ पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक १२८ पदे आरोक्य परिचारिका या पदाची आहेत.