मो. युसूफ पुंजानी यांची राजकीय सुरवात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाकडून कारंजा नगर परिषद नगरसेवक पदापासून झाली. मात्र माजी आमदार स्व. प्रकाश डहाके यांच्यासोबत झालेल्या अंतर्गत वादामुळे त्यांनी या पक्षातून बाहेर पडत कारंजा मतदार संघात मोठा चाहता वर्ग जमा केला. त्यानंतर माजी खासदार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात भारिप बहुजन महासंघात प्रवेश करून २०१४ साली भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढली, मात्र काही मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारिपने तिकीट नाकारल्याने त्यांनी बसपा पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढविली. त्यातही त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेर त्यांनी काही दिवसात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करून जिल्ह्यात काॅंग्रेस पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न केले. मतदारसंघाचे समीकरण पाहून अनेक राजकीय नेतेमंडळी आपल्या सोयीच्या पक्षात जाण्यासाठी इच्छुक असल्याचे चित्र कारंजा -मानोरा मतदार संघात बघायला मिळत आहेत. मो. युसूफ पुुुंजानीही सध्या मुंबई येथे गेले असून, ते पक्षांतराच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
-------------
कोट:
आजवर जनतेच्या सहकार्याने मी राजकारणात मोठा झालो. ज्या पक्षात मतदारांची, जनतेची कामे होतील, त्या पक्षात मला जाण्याचा विचार करावा लागेल. मतदार संघातील समस्यांचा पाढा आपण राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे मांडला आहे.
-मो युसूफ पुंजानी,
कारंजा